Posts

दिवसाची प्रतिक्षा

दिवसाची प्रतिक्षा   रात्रीच्या काळोखात काय होत असेल दिवसाचं, अज्ञात पाहुण्याच्या चाहुलीनं कापत असेल काळीजही त्याचं. मग आठवत असेल त्याला क्षितिजावरील पहाट, आणि उठत असेल सायंकाळच्या गप्पांचं  काहूर त्याच्या मनात. घट्ट मिठीत धरून प्रकाशाला, विनवण्या करत असेल आता जातो कशाला. तुझ्या सहज वावरण्याने असतो मी प्रसन्न, तुझ्या जाण्यामुळे माझ्या चहूदिशा खिन्न. आज जर का माझे अस्तित्व आहे सुंदर, कारण त्याला आहे तुझ्या प्रेमाची झालर. अर्धा तुझा आणि अर्धा माझा, असा हिस्सा वाटून घेऊ. सायंकाळच्या संधिप्रकाशात एकमेकांत विसावू. तू माझं सुख घे, मी तुझं दुःख घेतो... कोण आपल्या सावलीही जीवनाचे शत्रू होतो? जर तुला वाटत असेल मी का घेतो एव्हढा हिस्सा, जास्तीचं तू घे, तुझं-माझं काय किस्सा! अशीच असते जगाची रीत, असेच असतात सारे बंध... युगायुगांच्या प्रतीक्षेनंतर जुळून येतात असे संबंध. रेशीम बंध जोडून घेऊ, सोबत संसार करत जाऊ...

कळी

कळी  आज कर्माची कळी उमलली  न खुलताच उमगली  जयाच्या शोधात आजवर घालविले  युगे न  युगे आज त्याच्या बोधात हरविले  या युगाचे रहस्य तो जाणेना  मी जाणेना  पण एक मात्र समजले मला  जाता जाता हा क्षण सांगून गेला हलकेच कानात हलकेच मनात  तू क्षणक्षण तीळ-तीळ साचत असलेल्या गोष्टींची केली साठवण  आता राहील उदयावर  प्रत्येक एका श्वासातून तू भरशील घागर ...  जी साठवेल अंत आणि अंतर  जाता जाता हा क्षण मला सांगून गेला असे हा सुंदर  जगून घे सूक्ष्मतम  साचतिल जयाला तयाचे  तू मात्र साठव सूक्ष्मतम उत्तम  कर्माची हीच कळी आता खुलली ...  बहरली !

दिपदान उत्सव ( दिपदानोत्सव ) --- Dipadaan Utsav (Dipdanotsav)

Image
                                                                  दिपदान उत्सव ( दिपदानोत्सव )                           प्राचीन भारतात म्हणजेच, ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात आजचा जो दिवाळी किंवा दिपावली हा सण आहे... तो दिपदान उत्सव म्हणून साजरा केला जाई. ह्या काळात ह्या सणामध्ये आजकाल जी लक्ष्मीची पूजा केली जाते त्याप्रकारे पूजा केली जात नसत. त्याकाळी ह्या दिवसात धान्याची कापणी झालेली असायची आणि त्याकाळचे राजे जे कि ( प्रांत ) ज्यांना पूर्वी संघ असे म्हंटले जात अथवा ज्या राज्यांना राजे नसत त्यांना गणराज्य असे संबोधले जात ती राज्ये धन-धान्य, पैसा-अडका, सोनी-नाणी इत्यादींनी समृद्ध असत. त्यामुळे ह्या हंगामात झालेल्या एकूण पिकाची पूजा केली जात. ती कशी ती आपण पाहू.   ...

खुप सुंदर ( Interview ) मुलाखत. सगळ्यांनी पाहावी.

खुप सुंदर ( Interview ) मुलाखत. सगळ्यांनी पाहावी.             भावना मांडणं किंवा व्यक्त होणं प्रत्येकालाच वाटतं. आणि तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.  कारण माणूस जन्माला आला कि प्रथमतः तो रडतो का तर त्याला व्यक्त करायचे असते कि त्याला भूक लागली आहे आणि त्याला आईच्या दुधाची गरज आहे. बरोबर?               आता हेच घ्या ना, समाजामध्ये आपण वावरतो तेव्हा आपल्यात विचारांची देवाण - घेवाण होते ते मूक - बधिर होऊन नाही तर बोलून. हेच ह्या जप्रसिद्ध जीवन  शास्त्रज्ञाने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे.                ज्यांचे नाव जेरेमी ग्रीफीथ असे आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनात अत्यंत चौकस बुद्धीने माणसाच्या वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. मग ती मानसिक, शारीरिक, बौद्धिक अथवा सामाजिक किंवा वैयक्तिक असो.               त्यांच्या संशोधनात  जेरेमी ग्रीफीथ यांनी अनेक धार्मिक साहित्यच नाही तर अनेक शास्त्रिय साहित्याचा देखिल अभ्...

काय होतं जेव्हा...

( एका संवेदनशील माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यातील छोटीशी कथा. )  मी संवेदनशील आहे.    यात काही गैर नसावे. माणसाचे संवेदनशील असणे, म्हणजे मुळात त्याच्या माणूसपणाचे लक्षण आहे.  असे मला तरी वाटते. संवेदनशील माणूस दुखावला जातो सहज दुःखी होतो हे मान्य, पण जर माणसाला दुःख झाले नाही तर तो भावनाशील होणार कसा? त्याला स्वतःच्या मनाच्या भावना समजणार कश्या? मुळात जीवनाच्या सत्याप्रत पोहचणार कसा? कि, आयुष्यात दुःख हे आहेच. कारण... त्याला मन हे आहे. हो ना?... मन हे प्रत्येकालाच असते. आता मनाच्या संवेदना समजता आल्या नाही तर किती अवघड होईल... आणि त्यांचे उलगडणे हे खूपच असाध्य होईल. मग .. तो माणूस हळू हळू स्वतःपासून दुरावत जाईल आणि त्याची जागा एक दुर्धर अहं घेईल. ज्याची अनुत्पती एका विकृत, एका दुराभिमानी माणसात होईल.       संवेदनशील माणूस जेव्हा दुखावला जातो तेव्हा तो अंतःर्मुख होतो व स्वतःच्या दुःखाचे कारण विचारतो... स्वतःला. तेव्हा त्याला हे जाणवते कि हो, माझ्या मनाला इजा झाली... याचा अर्थ मला मन आहे... पण याचा अर्थ असा नाही कि दुसऱ्याला मन नाही. आणि मी त्याला दुःख ...

तुम भी क्या याद करोगे।

चलो यकीन कर लिया  के तुम मासूम हो , के कहके के दर्द  तुम्हारा अपना हैं।  तुम सच में मासूमियत से  बच जाओगे ? अपने ही बनाये गड्ढे  में से तुम उभर जाओगे ? तो क्यों तुमने पुराने जख्म  ताज़ा किये  दुनिया के लिए खड़े  अफ़साने मज़ाकिये।  चलो मान लिया के  तुम मासूम हो  पर क्या सच में  हर बात से बेमालूम हो ? के ज़ालिम तीर चलाया नज़र का  के छुरी उस पार न हो गयी।   के अब ना जीना ढंग का  न मौत मुनासिब रही।                          - काजल 

माझी कविता

          माझी कविता  मन भिरभिर पाखरू...  का भुतकाळात फिरू ...? लागले आसमंतात भिरभिरू ...  म्हणे बहरू - बहरू ...  मनात हा कहूर कहूर  न जाणे  विभोर विभोर किती जाणे हे घोर ...  मना  कठोर ...  कोणा सांगु हि घालमेल ...  मना चाले हा विध्वंस ...  काही सुचेना ..सुचेना  जया  सांगू आता असा  कोण मिळेना ... मिळेना  दुःखदायी हि भावना सुखदायी असे  काही  दुःखदायी असे कोणी , कोणी असे सुखदायी  पण सांगु  हे मी कोणा ...  कसे वेदना हि काही .                                            - काजल