खुप सुंदर ( Interview ) मुलाखत. सगळ्यांनी पाहावी.

खुप सुंदर ( Interview ) मुलाखत. सगळ्यांनी पाहावी.  

          भावना मांडणं किंवा व्यक्त होणं प्रत्येकालाच वाटतं. आणि तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. 
कारण माणूस जन्माला आला कि प्रथमतः तो रडतो का तर त्याला व्यक्त करायचे असते कि त्याला भूक लागली आहे आणि त्याला आईच्या दुधाची गरज आहे. बरोबर?
            आता हेच घ्या ना, समाजामध्ये आपण वावरतो तेव्हा आपल्यात विचारांची देवाण - घेवाण होते ते मूक -
बधिर होऊन नाही तर बोलून. हेच ह्या जप्रसिद्ध जीवन शास्त्रज्ञाने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. 
            ज्यांचे नाव जेरेमी ग्रीफीथ असे आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनात अत्यंत चौकस बुद्धीने माणसाच्या वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. मग ती मानसिक, शारीरिक, बौद्धिक अथवा सामाजिक किंवा वैयक्तिक असो. 
             त्यांच्या संशोधनात जेरेमी ग्रीफीथ यांनी अनेक धार्मिक साहित्यच नाही तर अनेक शास्त्रिय साहित्याचा देखिल अभ्यास केला. आणि त्याच बरोबर त्यांनी त्या संशोधनार्थीचा उल्लेखही केला आहे. अनेक विचारवंत जस कि हेसीऑड्स, प्लेटो यांचाही संदर्भ दिला आहे. 
              जेरेमी ग्रीफीथ म्हणतात कि बोलणं, व्यक्त होणं ह्यात काही गुन्हा नाही खरंतर कि एक गरज आहे. आता ते कसं, तर त्यास ते म्हणतात ( कॉन्फ्रोन्टिंग ) म्हणजेच समोरासमोर बोलणे, तोंड देणे. असं का, त्याचा आदिम काळात माणूस सर्वार्थाने परिपूर्ण होता कारण तो त्याच्या अंतर्स्फूतीने सहजज्ञानाने वागायचा पण जसा त्याचा मेंदू विकसित होता गेला तसा तो स्वतंत्र पद्धतीने विचार करू लागला. तोपर्यंत त्यात स्पर्धा नव्हती किंवा त्याला अधिकारसत्ता हेही माहित नव्हते. आणि तो काळानुरूप बदलू लागला आणि तेथून सगळे बदलत गेले. कारण तो अनुवंशिकता आणि मज्जारज्जू ह्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, आणि हेच ह्या शास्त्रज्ञाने सांगितले आहे. ह्याचा दीर्घ अभ्यास करून ह्या जगप्रसिद्ध तज्ञास काय सांगायचे आहे ह्याबद्दल मी कसे बोलणार? ते तुम्हीच ह्या व्हिडीओ मध्ये बघा. आणि माहितीपूर्ण व्हा. 

            तर मित्रहो, ह्या मुलाखतीचा व्हिडीओ फ्री आहे त्याची लिंक सहज मी माझ्या ब्लॉग मध्ये शेयर करते आहे. तुम्ही ह्याचा लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा. 
            धन्यवाद!       


The Human Condition Solved! - World Transformation Movement https://www.humancondition.com/?utm_source=GoogleMax&utm_medium=cpc&utm_campaign=GoogleMax-india&utm_content=GoogleMax&gad_source=1&gclid=CjwKCAjwwr6wBhBcEiwAfMEQswQtuhHShGfIgnrnVrqJuZv00Wh4_kISzJRSs9r2OWP9Xs6d17xQNBoCnjYQAvD_BwE



Note :- All the credits goes to Australian Biologist Jeremy Griffith, The interviewer Craig Conway, World Transformation Movement, The link www.humancondition.com, www.World transformation.com, And last but not least The Facebook Media. 
I thank them. Thank you! 

Comments

Popular posts from this blog

कळी

दिवसाची प्रतिक्षा

दिपदान उत्सव ( दिपदानोत्सव ) --- Dipadaan Utsav (Dipdanotsav)