कळी

कळी 

आज कर्माची कळी उमलली 

न खुलताच उमगली 

जयाच्या शोधात आजवर घालविले 

युगे न  युगे आज त्याच्या बोधात हरविले 

या युगाचे रहस्य तो जाणेना 

मी जाणेना 

पण एक मात्र समजले मला 

जाता जाता हा क्षण सांगून गेला

हलकेच कानात हलकेच मनात 

तू क्षणक्षण तीळ-तीळ साचत असलेल्या गोष्टींची केली साठवण 

आता राहील उदयावर 

प्रत्येक एका श्वासातून तू भरशील घागर ... 

जी साठवेल अंत आणि अंतर 

जाता जाता हा क्षण मला सांगून गेला असे हा सुंदर 

जगून घे सूक्ष्मतम 

साचतिल जयाला तयाचे 

तू मात्र साठव सूक्ष्मतम उत्तम 

कर्माची हीच कळी आता खुलली ... 

बहरली !

Comments

Popular posts from this blog

दिवसाची प्रतिक्षा

दिपदान उत्सव ( दिपदानोत्सव ) --- Dipadaan Utsav (Dipdanotsav)