( एका संवेदनशील माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यातील छोटीशी कथा. )
मी संवेदनशील आहे.
यात काही गैर नसावे. माणसाचे संवेदनशील असणे, म्हणजे मुळात त्याच्या माणूसपणाचे लक्षण आहे.
असे मला तरी वाटते. संवेदनशील माणूस दुखावला जातो सहज दुःखी होतो हे मान्य, पण जर माणसाला दुःख झाले नाही तर तो भावनाशील होणार कसा? त्याला स्वतःच्या मनाच्या भावना समजणार कश्या? मुळात जीवनाच्या सत्याप्रत पोहचणार कसा? कि, आयुष्यात दुःख हे आहेच. कारण... त्याला मन हे आहे. हो ना?... मन हे प्रत्येकालाच असते. आता मनाच्या संवेदना समजता आल्या नाही तर किती अवघड होईल... आणि त्यांचे उलगडणे हे खूपच असाध्य होईल.
मग .. तो माणूस हळू हळू स्वतःपासून दुरावत जाईल आणि त्याची जागा एक दुर्धर अहं घेईल. ज्याची अनुत्पती एका विकृत, एका दुराभिमानी माणसात होईल.
संवेदनशील माणूस जेव्हा दुखावला जातो तेव्हा तो अंतःर्मुख होतो व स्वतःच्या दुःखाचे कारण विचारतो... स्वतःला. तेव्हा त्याला हे जाणवते कि हो, माझ्या मनाला इजा झाली... याचा अर्थ मला मन आहे... पण याचा अर्थ असा नाही कि दुसऱ्याला मन नाही. आणि मी त्याला दुःख देत राहील, हिणवत राहील. जर मी एक संवेदनशील माणूस आहे, तर मी काही काळासाठी का होईना अंतःर्मुख होईल आणि त्या समोरच्या व्यक्तीला माफ केल्यावर पूर्ववत स्थितीत येईल आणि स्वतः तरी अशी चूक करू नये अशी काळजी घेईल. आणि त्या व्यक्तीला आपलंसं करील.
आणि म्हणूनच संवेदनशील मनुष्य प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. कारण तो भावना जाणतो आणि म्हणुनच भावना जपतो.
कारण, मित्रहो ह्या विश्वात संपूर्णपणे परीपूर्ण असा कोणीच नसतो. प्रत्येकात अवगुण हे असतातच, त्या व्यक्तीला
गुण-अवगुणांसह स्विकारणं हे देखील संवेदनशील माणसाचं लक्षण आहे. तेव्हाच कुठे जाऊन हि सृष्टी पूर्ण होते. आणि माणूस जगणं शिकतो.
आपल्या सेवेदखल प्रतित एक लेख.
Comments