सवड नाही प्रेम करायला.
ती :- माझ्या नजरेस नजर मिळवू नकोस,
माझ्या प्रेमात पडशील.
हाती आले नाही तर
आयुष्यभर रडत बसशील.
तो :- प्रेमात मी तुझ्या पडलोय
जे नाही करायचं ते करून बसलोय.
ती :- प्रेम करायला सवड नाही.
अजून ठरलेली निवड नाही.
तो :- निवडायचंय तर मला निवड.
माझ्यात काय कमी आहे?
मागशील ते देईल,
तुझ्यासाठी तर जानही हाज़िर आहे.
ती :- मला जान नको.
मला साथ हवी आहे.
आयुष्यभर प्रेमाची बरसात हवी आहे.
साथ हवी आहे जीवनाची.
साथ हवी आहे आयुष्याची.
संकटात लढण्याची.
साथ हवी आहे सुख-दुःखाला,
सामोरे जाण्याची.
मला स्वप्नातला राजकुमार नको.
परिस्थितीतला माणूस हवा.
माणुसकीतला माणूस हवा.
आहेस तू तयार ?
आयुष्य लढायला.
संकटात सोबत द्यायला.
तरच तयार आहे मी तुझी व्हायला.
नाहीतर, हो बाजूला!
सवड नाही मला प्रेम करायला.
माझ्या प्रेमात पडशील.
हाती आले नाही तर
आयुष्यभर रडत बसशील.
तो :- प्रेमात मी तुझ्या पडलोय
जे नाही करायचं ते करून बसलोय.
ती :- प्रेम करायला सवड नाही.
अजून ठरलेली निवड नाही.
तो :- निवडायचंय तर मला निवड.
माझ्यात काय कमी आहे?
मागशील ते देईल,
तुझ्यासाठी तर जानही हाज़िर आहे.
ती :- मला जान नको.
मला साथ हवी आहे.
आयुष्यभर प्रेमाची बरसात हवी आहे.
साथ हवी आहे जीवनाची.
साथ हवी आहे आयुष्याची.
संकटात लढण्याची.
साथ हवी आहे सुख-दुःखाला,
सामोरे जाण्याची.
मला स्वप्नातला राजकुमार नको.
परिस्थितीतला माणूस हवा.
माणुसकीतला माणूस हवा.
आहेस तू तयार ?
आयुष्य लढायला.
संकटात सोबत द्यायला.
तरच तयार आहे मी तुझी व्हायला.
नाहीतर, हो बाजूला!
सवड नाही मला प्रेम करायला.
Comments