मैत्री
मैत्री
मैत्री असावी अशी फुलासारखी,
फुलपाखराला मधुगंध देणारी.
देवघरातल्या अगरबत्तीसारखी,
आसमंतात दरवळणारी.
आकाशातल्या चंद्रासारखी,
कलेकलेनं वाढणारी.
पणतीच्या ज्योतीसारखी,
प्रकाशमान करणारी.
अशी निखळ मैत्री,
जी आयुष्यभर पुरणारी;
आणि, पुरुन उरणारी !
Comments