A poem....
कदाचित हे जग असंच असेल,
प्रत्येकाच्या नजरेतून ते वेगळं दिसेल.
माझ्या नजरेला कळलेलं गणित,
तुझ्या नजरेला दिसत नसेल.
त्रिकोणातून पाहतांना किंवा काटकोनातून वळतांना,
निव्वळ एका कोनाचा फरक असेल.
ह्या कोनामुळे दृष्टिकोनाचा फरक असेल,
कधी दिवस तर कधी रात्रीचा फरक असेल.
तरीही, रात्रीच्या अंधाराला दिवसाच्या उजेडाची ओढ असेल,
कदाचित हे जग असंच असेल.
- काजल
प्रत्येकाच्या नजरेतून ते वेगळं दिसेल.
माझ्या नजरेला कळलेलं गणित,
तुझ्या नजरेला दिसत नसेल.
त्रिकोणातून पाहतांना किंवा काटकोनातून वळतांना,
निव्वळ एका कोनाचा फरक असेल.
ह्या कोनामुळे दृष्टिकोनाचा फरक असेल,
कधी दिवस तर कधी रात्रीचा फरक असेल.
तरीही, रात्रीच्या अंधाराला दिवसाच्या उजेडाची ओढ असेल,
कदाचित हे जग असंच असेल.
- काजल
Comments