मैत्री
मैत्री मैत्री असावी अशी फुलासारखी, फुलपाखराला मधुगंध देणारी. देवघरातल्या अगरबत्तीसारखी, आसमंतात दरवळणारी. आकाशातल्या चंद्रासारखी, कलेकलेनं वाढणारी. पणतीच्या ज्योतीसारखी, प्रकाशमान करणारी. अशी निखळ मैत्री, जी आयुष्यभर पुरणारी; आणि, पुरुन उरणारी !