माझी कविता
माझी कविता मन भिरभिर पाखरू... का भुतकाळात फिरू ...? लागले आसमंतात भिरभिरू ... म्हणे बहरू - बहरू ... मनात हा कहूर कहूर न जाणे विभोर विभोर किती जाणे हे घोर ... मना कठोर ... कोणा सांगु हि घालमेल ... मना चाले हा विध्वंस ... काही सुचेना ..सुचेना जया सांगू आता असा कोण मिळेना ... मिळेना दुःखदायी हि भावना सुखदायी असे काही दुःखदायी असे कोणी , कोणी असे सुखदायी पण सांगु हे मी कोणा ... कसे वेदना हि काही . - काजल